कसा घडलो मी

पंकज दुसाने, संस्थापक अध्यक्ष

महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या नावाच आणि त्या संदर्भात कुठल्या ना कुठल्या गोष्टी प्रती आकर्षण हे असतेच. एकी कडे लहानपणापासूनच कलेची आवड असल्यामुळे दुर्मिळ व पुरातन वस्तूंचे आकर्षण मनात घर करायला लागले. व दुर्मिळ व पुरातन वस्तूं बघितल्यावर मनात खूप अस्वस्थता वाढायची की संस्कृतीचा इतिहासाचा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असा कचरा धुळखात पडत आहे, याच्याशी कुणालाच काही घेणं देणं नाही.  हे कुठे ना कुठे थांबला पाहिजे आणि याचे सुरुवात मी स्वतः पासन करायचं ठरवलं. तिथूनच खऱ्या अर्थाने संग्रह करायला सुरुवात झाली. मग संग्रह करायला सुरुवात केली वडिलांचे भांड्यांचे दुकान असल्यामुळे दुकानात भंगार मध्ये बंद पडलेले जुने नाणे शोधण्याचे मोहिमत चालू केली. त्यात ब्रिटिश कालीन नाणे,तांब्याचे नाणे,डब्बू पैसे मिळू लागले..

त्यावेळी बंद झालेले पैसे/चलन पाच पैसे,दहा पैसे, जुना एक पैसा, ब्रिटिश कालीन पैसे,वेगवेगळे नाणे संग्रहाकडून आणि नातेवाईकांकडून उपलब्ध झाले. त्यात प्रामुख्याने मुघल कालीन,मराठा कालीन,निजाम कालीन असे अनेक प्रकारचे नाणे मिळाले आणि संग्रह हा वाढत गेला. त्यात एके दिवशी एक अगदी वेगळा मराठीमध्ये वाचता येणारा मला कॉइन मिळाला त्यावर लिहिले होते. श्री राजा शिवछत्रपती ( शिवराई ).. मग छत्रपती शिवरायांचा अभ्यास म्हणजेच शिवचरित्र वाचण्यास सुरुवात केली, ते सुरू असताना मी नेमकं शिवकाळातच जगत आहो असा भास व्हायचा. एके दिवशी मी दुकानात निवांत बसलो होतो त्यावेळी एक आजीबाई 60 ते 70 वर्षाचे एका पिशवीत काही जुन्या वस्तू भंगारामध्ये विकण्यासाठी आल्या आणि त्या निघून गेल्या. योगायोगाने त्यात एक सुंदर असे असे हत्ती असलेला दिवा माझ्या नजरेस पडला ते बघताच अत्यंत मनाला आनंद झाला की एक वेगळे काही वस्तू मला मिळणार ते म्हणजे एक दुर्मिळ अतिशय सुंदर असलेला गजलक्ष्मी दिवा होता.  घरी भरपूर वाद झाल्यानंतर वस्तू माझ्याकडे आली. तिथूनच पितळी वस्तूची संग्रह करायची सुरुवात झाली. मग काय शिवचरित्र हे एक समुद्रच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना कशी केली असेल यांचा प्रामाणिक अभ्यास सुरू केला त्यात प्रामुख्याने गडकोट,मावळे महाराजांची युद्धनीती त्यात प्रामुख्याने वापरले गेलेले शस्त्र याचं कुतूहल मनात घर करत होते. आणि मग तलवार,कट्यार,दांडपट्टा याचा शोध घ्यायला सुरुवात केली. गावातल्या लोखंड भंगाराच्या दुकानातून झाली मग शिवचरित्र वाचणारा व्यक्ती कुठेही थांबत नाही याचे उदाहरण म्हणजे मी स्वतः वय जसं वाढत होतं तसा संग्रह ही वाढत होता तसा अभ्यासही वाढत होता आणि अनेक गुरुवर्य मला भेटले याच्यात सोलापूरचे डॉक्टर शिवरत्न शेटे सर यांच्या माध्यमातून गडकोट भ्रमंती शिवभक्त आचरण करता असावा हा विचार कळला सोबतच  जयसिंगपूर चे आमचे गुरु आदरणीय वंदनीय  श्री गिरीश जी जाधव काका यांचे प्रदर्शन प्रदर्शन सुरुवातीला नगर येथे बघण्याच्या योग आला त्या मध्ये त्याचा नाणे संग्रह व तांब्या पितळाच्या वस्तूंचा संग्रह बघुन आनंद झालं. त्याचप्रमाणे आपण शस्त्रांचाही संग्रह करू शकतो किंवा अशा वस्तू घरी भरपूर आहे याची प्रचिती मला लक्षात आली मग काय तर संग्रह वाढतच गेले.

वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षापासून दुर्मिळ शस्त्रे  व नाणे गोळा करायचा छंद निर्माण होऊन कालांतराने हा छंद आवडीत रूपांतर होऊन ते शस्त्र संग्रह व दुर्मिळ नाणे संग्रह अभ्यासक झाले.  हे करत असताना मनात पुन्हा एकदा सामाजिक दृष्टिकोनाने विचाराला शिवछत्रपतींचा आणि सांस्कृतिक हा विचार व्यक्तिगत ठेवणे योग्य नाही किंवा याचा लाभ समाजाला मिळणार नाही किंबहुना असं करून आपण कित्येक शिवप्रेमींना वंचित ठेवत आहोत अशी भावना मनाला टोचली. मनात विचार केला आणि हे व्यक्तिगत न करता कुठल्या संस्थे माध्यमातून केलं तर हा ठेवा भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाईल हा दूरदृष्टी घेऊन स्पार्क फाउंडेशन याचा पाया रचला. आज पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर शेकडोच्या वर शस्त्र प्रदर्शचं आयोजने झालीत. त्यात प्रामुख्याने नागपूर पासून कोल्हापूर, सोलापूर,अकोला पंढरपूर, औरंगाबाद  तसेच मोठ्या मोठ्या नामांकित शाळा व संस्थेने आयोजन केलेल आहे.

स्पार्क फाउंडेशनच्या वतीने प्रदर्शन करता करता या निमित्ताने भेटलेले आणि थोर गुरुवर्यांचा मला सहवास लाभला. स्वर्गीय गिरीश जाधव डॉक्टर शिवरत्न शेटे सर बाबासाहेब पुरंदरे ना धो मनोहर जयसिंगराव पवार तसेच जिथे जिथे प्रदर्शन झाले तिथले स्थानिक आमदार, सामाजिक कार्यकर्ते, प्रमुख अतिथी आणि प्रतिनिधी  छत्रपती संभाजी राजे भोसले कोल्हापूर मदत पुनर्वसन मंत्री अनिल दादा पाटील अमळनेर खा.सुधाकर शृंगारे साहेब लातूर यशवंत गोसावी पुणे संगीत सम्राट श्री सुरेश वाडकर  शिवकालीन शस्त्र विषयी असलेले उत्सुकता प्रत्यक्ष शस्त्र प्रदर्शन पहिल्यावर समाधान होते

 इतिहास प्रेमींसाठी प्रत्यक्ष शस्त्र पाहून शस्त्रांचे प्रकार काय कुठल्या अंगाला काय म्हणतात त्याचं वजन किती अशा अनेक गोष्टीचे उत्तर त्यांना मिळते. महत्त्वाचे म्हणजे शिवकाळाआधीचे शस्त्र आणि शिवकारात्मक छत्री यामध्ये काय फरक झाला होता याचाच आपल्याला शिवछत्रपतींची दूरदृष्टी साक्षी शस्त्राबद्दल सप्रेम आपल्याला समजते तलवारीचा वजन कमी करणे तलवारीची लांबी वाढवणे परत लावणे युद्ध शास्त्राप्रमाणे त्याबद्दल बदल करणे या सर्व गोष्टीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी खुद्द लक्षपूर्वक अभ्यास करून हा बदल केला.

आमचे मिशन

भारतीय ऐतिहासिक शस्त्र आणि वस्तू यांचे संग्रह,जतन, संवर्धन, संशोधन आणि प्रदर्शन करून लोकांना प्रेरणादाई इतिहास दाखवणे.

आमचे व्हिजन

पुढच्या पिढी पर्यंत भारतीय ऐतिहासिक वारसा, संस्कृती टिकवणे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा शून्य ते अनंत हा विचार पोहचवणे.

आमचे मुळ तत्व

जनतेला, विद्यार्थ्यांना, कलाप्रेमींना, आणि ऐतिहासिक वस्तूंची आणि शस्त्रांची ओढ लावून शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाने आपला ज्वलंत इतिहास टिकून ठेवणे.

X